
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला. तर सोयाबिनला सरासरी 6171 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या 17 हजार 800 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 600 ते 800 रुपये, जोड कांदा 100 ते 300 रुपये बाजारभाव मिळाले. डाळिंबाच्या 14 हजार 986 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.
सोयाबिनला कमीत कमी 6100, जास्तीत जास्त 6171 रुपये तर सरासरी 6135 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. हरभरा सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2376 रुपये, मका (डंकी) सरासरी 1200 रुपये क्विंटल, ज्वारी सरासरी 2100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.