राहाता बाजार समितीत कांदा 1850, सोयाबीन 5626 रुपये

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल 1850 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला प्रतिक्विंटल 5625 रुपये इतका भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 7 हजार 237 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1450 ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1400 रुपये, कांदा नंबर 3 ला 350 ते 850 रुपये, गोल्टी कांदा 700 ते 1000 रुपये, जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5626 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. हरभरा कमीत कमी 3550 रुपये तर जास्तीत जास्त 4100 रुपये, सरासरी 3909 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत जास्त 2751 रुपये, तर सरासरी 2650 रुपये भाव मिळाला. मकाला कमीत कमी 1570 रुपये, जास्तीत जास्त 1920 रुपये तर सरासरी 1800 रुपये असा भाव मिळाला. मुग (डंकी ) सरासरी 4499 रुपये भाव मिळाला.

भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. प्रतिक्विंटल प्रमाणे भाव - बटाटा कमीत कमी 2100 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये, तर सरासरी 2200 रुपये. भेंडी कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 5500 रुपये, तर सरासरी 5000 रुपये. लिंबू कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, तर सरासरी 1500 रुपये. दुधी भोपळा कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, तर सरासरी 1700 रुपये. फ्लॉवर कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 900 रुपये, तर सरासरी 700 रुपये. ढोबळी मिरची कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये, तर सरासरी 1900 रुपये. दोडका (शिराळी )कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, तर सरासरी 1500 रुपये.

गाजर कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत जास्त 3500 रुपये, तर सरासरी 3000 रुपये. वांगी कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 3200 रुपये, तर सरासरी 2300 रुपये. मिरची हिरवी कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये, तर सरासरी 2500 रुपये. तोंडली सरासरी 1500 रुपये, टोमॅटो कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, तर सरासरी 700 रुपये. काकडी कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, तर सरासरी 700 रुपये. कोबी कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये, तर सरासरी 700 रुपये. कोथिंबीर नग 2 ते 7 रुपये सरासरी 5 रुपये, मेथी भाजी सरासरी 15 रुपये प्रति नग, पालक 4 ते 8 रुपये, सरासरी 6 रुपये, शेपू 10 ते 15 रुपये नग, सरासरी 12 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती, बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com