राहाता बाजार समितीत कांदा 3800, सोयाबीन 5371 रुपये

राहाता बाजार समितीत कांदा 3800, सोयाबीन 5371 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला तीन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर सोयाबीनला 5371 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत काल 3800 कांद्यांच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 2 ला 2900 ते 3800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 1750 ते 2850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर तीन ला 600 ते 1700 रुपये भाव मिळाला. बोलती कांद्याला 1800 ते 2200 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4501 रुपये, जास्तीत जास्त 5371 रुपये. तर सरासरी 5200 रुपये भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2600 रुपये, जास्तीत जास्त 2707 रुपये, तर सरासरी 2650 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1700 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. तर हरभरा सरासरी 4400 असा भाव मिळाला.डाळिंबाच्या 864 क्रेट्स ची आवक झाली.

डाळिंब नंबर 1 ला 131 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला डाळिंब नंबर चार ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला .सीताफळाला कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 3500 रुपये, तर तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com