
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत काल मंगळवारी 3652 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. सोयाबिनला जास्तीत जास्त 6776 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 850 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 450 ते 650 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंबाच्या 700 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये प्रतिकिलोला मिळाले. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 6300 रुपये, जास्तीत जास्त 6776 रुपये, सरासरी 6675 रुपये भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2150 रुपये, जास्तीत जास्त 2210 रुपये, तर सरासरी 2180 रुपये. हरबरा कमीत कमी 3825 रुपये, जास्तीत जास्त 4299 रुपये, सरासरी 4200 रुपये भाव मिळाला.
मकाला कमीत कमी 2211 रुपये, जास्तीत जास्त 2240 रुपये तर सरासरी 2225रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1776 रुपये, मेथी सरासरी3500 रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यंनी दिली.