राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबीन, डाळिंबाला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबीन, डाळिंबाला मिळाला 'हा' भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या (Onion) 3624 गोण्यांची आवक (Inward) झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2650 तर लाल कांद्याला (Onion) 2600 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 6636 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3 हजार 624 कांद्याच्या (Onion) गोण्यांची आवक (Inward) झाली. उन्हाळी कांदा (Onion) नंबर 1 ला 2350 ते 2650 रुपये तर लाल कांद्याला (Onion) 2300 ते 2600 असा भाव मिळाला. कांदा (onion) उन्हाळी नंबर 2 ला 1600 ते 2300 रुपये, लाल कांद्याला (Onion) 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला उन्हाळी 750 ते 1550 रुपये तर लाल कांद्याला (Onion) 800 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1700 ते 1900 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 200 ते 700 रुपये व लाल कांद्याला 100 ते 750 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 350 क्रेटसची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 110 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybean) 25 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 6400 ते जास्तीत जास्त 6636 रुपये भाव मिळाला. सरासरी 6525 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला (Corn) 1525 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर सिताफळाच्या 92 क्रेट्सची आवक झाली. सिताफळास कमीत कमी एका क्विंटलला 1000 तर जास्तीत जास्त 5500 रुपये व सरासरी 4000 रुपये असा भाव मिळाला, चिकू ला कमीत कमी 1925 तर जास्तीत जास्त 5500 व सरासरी 2500 असा भाव मिळाला, अशी माहिती सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com