राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचे वाचा आजचे बाजारभाव

राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचे वाचा आजचे बाजारभाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी कांद्याला (Onion) प्रतिक्विंटलला 1200 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 6790 रुपये इतका मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी 9131 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 900 ते 1200 रुपये, कांदा (Onion) नंबर 2 ला 450 ते 850 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 450 रुपये ते 650 रुपये, जोड कांदा (Onion) 100 ते 200 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 142 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 141 रुपये, जास्तीत जास्त 200 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 140 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 6650 रुपये, जास्तीत जास्त 6790 रुपये तर सरासरी 6725 रुपये भाव मिळाला. हरबरा (Gram) कमीत कमी 4200 रुपये, जास्तीत जास्त 4300 रुपये, तर सरासरी 4250 रुपये भाव मिळाला. मकाला 2205 रुपये, जास्तीत जास्त 2327, तर सरासरी 2265 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.