राहाता बाजार समितीत कांदा 3500 तर सोयाबीन 5801 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3500 तर सोयाबीन 5801 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 6097 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3500 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 5801 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 6 हजार 097 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 3000 ते 3500 रुपये तर लाल कांद्याला 2800 ते 3200 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 2150 ते 2950 रुपये, लाल कांद्याला 1850 ते 2750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 900 ते 2100 रुपये तर लाल कांद्याला 700 ते 1800 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 2200 ते 2500 रुपये व लाल कांद्याला 2100 ते 2400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 800 रुपये व लाल कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 6 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 31 ते 50 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 21 ते 30 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 11 ते 20 रुपये तर डाळिंब नंबर 4 ला 2.5 ते 10 रुपये इतका भाव मिळाला.

सोयाबीनची 19 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 5700 रुपये, तर जास्तीत जास्त 5801 रुपये व सरासरी 5750 इतका भाव मिळाला. मकाला 1515 रुपये, हरभरा 3860 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. चिकूला जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटलला असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com