राहाता बाजार समितीत कांदा 3205 तर सोयाबीन 6341 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3205 तर सोयाबीन 6341 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याच्या 5942 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3205 तर. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6341 रुपये इतका भाव मिळाला.

कांदा नंबर 1 ला 2700 ते 3205 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1750 ते 2650 रुपये, कांदा नंबर 3 ला 800 ते 1700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 700 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 101 के्रटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 31 ते 60 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 21 ते 30 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 11 ते 20 रुपये तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 10 रुपये असा प्रतिकिलो डाळिंबाला भाव मिळाला.

सोयाबीनची 40 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6298 ते जास्तीत जास्त 6341 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6300 रुपये भाव मिळाला. मकाला 1420 रुपये भाव मिळाला. हरबरा (डंकी) 4001 रुपये प्रतिक्विंटल, तुर सफेद 5000 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

चिकुच्या 58 क्रेटस ची आवक झाली. प्रतिक्विंटलला कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 2100 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.