राहाता बाजार समितीत कांदा 3000 तर सोयाबीन 6280 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3000 तर सोयाबीन 6280 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 4127 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2800 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला.

उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2500 ते 3000 रुपये तर लाल कांद्याला 2400 ते 2800 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2450 रुपये, लाल कांद्याला 1550 ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 700 ते 1600 रुपये तर लाल कांद्याला 600 ते 1500 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1900 ते 2100 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 600 रुपये व लाल कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 35 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 प्रतिकिलोला 46 ते 75 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 36 ते 45 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 11 ते 35 रुपये तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 10 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता मुख्य आवारात सोयाबीनला कमीत कमी 6280 असा भाव मिळाला तर कोल्हार उपशाखेत 6300 इतका भाव मिळाला. कोल्हारला कमीत कमी 6200 तर जास्तीत जास्त 6300 रुपये व सरासरी 6250 इतका भाव मिळाला. मकाला 1476 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर हरबरा 4661 रुपये, मका 1520 रुपये, गहू 2100 रुपये, बाजरी 1550 रुपये, चिकू ला जास्तीत जास्त 2000 रुपये, तर बोराला 1500 रुपये प्रति क्विंटलला असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com