राहाता बाजार समितीत लूज कांदा 1450 तर सोयाबीन 6168 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत लूज कांदा 1450 तर सोयाबीन 6168 रुपये क्विंटल
File photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी लुज कांद्याला प्रतिक्विंटल 1450 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6168 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत काल लुज कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1050 ते 1450 रुपये, कांदा नंबर 2 ला 600 ते 1000 रुपये, कांदा नंबर 3 ला 301 ते 550 रुपये, असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाच्या 1754 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 151 रुपये, तर जास्तीत जास्त 200 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 5899 रुपये, जास्तीत जास्त 6168 रुपये, तर सरासरी 6100 रुपये भाव मिळाला. हरबर्‍याला कमीत कमी 3998 रुपये, जास्तीत जास्त रुपये, सरासरी 4347 रुपये भाव मिळाला. सरासरी 4200 रुपये भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 2075 रुपये, सरासरी 2050 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com