राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 1100 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 6675 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी 8173 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये, कांदा नंबर 2 ला 450 ते 750, कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 400 ते 600 रुपये तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 426 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 180 रुपये, डाळींब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये, डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 6336 रुपये, जास्तीत जास्त 6675 रुपये तर सरासरी 6650 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 2351 रुपये, तर सरासरी 2175 रुपये. मका (Corn) कमीत कमी 2314 रुपये, जास्तीत जास्त 2339 रुपये तर सरासरी 2325 रुपये भाव मिळाला. मठ सरासरी 8000 रुपये क्विंटल, तर हरबरा (Gram) कमीत कमी 4280 रुपये, जास्तीत जास्त 4300 रुपये, तर सरासरी 4290 रुपये भाव मिळाला. ज्वारी सरासरी 1603 रुपये, तर तुर (डागी डंकी) 3100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com