
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 1100 रुपये भाव मिळाला. तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 6726 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
बाजार समितीत मंगळवारी 9520 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 450 ते 750 इतका भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 450 ते 650 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा (Onion) 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.
डाळींबाच्या (Pomegranate) 104 क्रेटस ची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.
सोयाबिनला (Soybean) कमीत कमी 6650 रुपये, जास्तीत जास्त 6726 रुपये, तर सरासरी 6685 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2100 रुपये, जास्तीत जास्त 2390 रुपये, सरासरी 2250 रुपये इतका भाव मिळाला. हरबरा (Gram) कमीत कमी 4300 रुपये, जास्तीत जास्त 4441 रुपये, सरासरी 4375 रुपये, बाजरीला सरासरी 1912 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.