
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी कांद्याला (Onion) 1100 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 6800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी 9012 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 450 ते 850 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 450 ते 650 रुपये भाव मिळाला तर जोड कांदा (Onion) 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 44 क्रेटसची आवक झाली. नंबर 1 ला 111 ते 140 रुपये भाव मिळाला. नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 6570 रुपये, जास्तीत जास्त 6800 रुपये तर सरासरी 6685 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2170 रुपये, जास्तीत जास्त 2312 रुपये, सरासरी 2250 रुपये इतका भाव मिळाला. हरबरा सरासरी 4350 रुपये, तुरीला सरासरी 5200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.