राहाता बाजार समितीत कांदा 3000 तर सोयाबीन 6320 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3000 तर सोयाबीन 6320 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल सोमवारी कांद्याच्या 9355 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6320 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 9 हजार 355 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाला प्रतीक्विंटलला कमीत कमी 2750 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये तर सरासरी 3500 रुपये असा भाव मिळाला.

सोयाबीनची 12 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6301 रुपये तर जास्तीत जास्त 6320 रुपये व सरासरी 6310 इतका भाव मिळाला. मकाला 1651 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तुरीला 5401 रुपये, चिकूला कमीत कमी 300 रुपये, जास्तीत जास्त 2750 रुपये तर सरासरी 2000 प्रति क्विंटलला असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.