राहाता बाजार समितीत कांदा 3500 तर सोयाबीन 6400 रुपयांवर

राहाता बाजार समितीत कांदा 3500 तर सोयाबीन 6400 रुपयांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 3768 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2700 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6400 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 3 हजार 768 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2600 ते 3000 रुपये तर लाल कांद्याला 2300 ते 2700 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1850 ते 2550 रुपये, लाल कांद्याला 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 900 ते 1800 रुपये तर लाल कांद्याला 800 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 2100 ते 2300 रुपये व लाल कांद्याला 1900 ते 2100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 800 रुपये व लाल कांद्याला 100 ते 700 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 108 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 71 ते 85 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 51 ते 70 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 50 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 64 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6100 ते जास्तीत जास्त 6400 रुपये भाव मिळाला. सरासरी 6250 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला 1400 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर सिताफळाच्या 160 क्रेट्सची आवक झाली. सिताफळास कमीत कमी एका क्विंटलला 1500 तर जास्तीत जास्त 7000 रुपये व सरासरी 4000 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com