राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये तर सोयाबीन 7325

राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये तर सोयाबीन 7325

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 7325 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत काल 2025 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 750 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 450 ते 650 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंबाच्या 485 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7237 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये तर सरासरी 7300 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

गव्हाला कमीत कमी 2051 रुपये, जास्तीत जास्त 2140 रुपये तर सरासरी 2100 रुपये भाव मिळाला. हरबरा सरासरी 4500 रुपये इतका भाव मिळाला. मकाला कमीत कमी 2299 रुपये, जास्तीत जास्त 2395 रुपये, तर सरासरी 2312 रुपये इतका भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.