राहाता बाजार समितीत कांदा 2700 तर सोयाबीन 6334 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 2700 तर सोयाबीन 6334 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी कांद्याच्या 9060 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2700 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6334 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 9 हजार 60 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1450 ते 2250 रुपये, कांदा नंबर 3 ला उन्हाळी 500 ते 1400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 15 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6051 रुपये तर जास्तीत जास्त 6334 रुपये व सरासरी 6225 इतका भाव मिळाला. मकाला 1526 रुपये भाव मिळाला. तुरीला 5200 रुपये भाव मिळाला. चिकूला जास्तीत जास्त 2000 रुपये प्रतिक्विंटलला असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com