उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव

उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) उन्हाळी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1800 रुपये तर लाल कांद्याला (Onion) 2500 रुपये भाव मिळाला.

उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव
अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी तरुणास जन्मठेप

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या (Onion) 6178 गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला (Onion) कांदा नंबर 1 ला प्रतिक्विंटल 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 700 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

लाल कांदा नंबर 1 ला 1700 ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1150 ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव
पाणी योजनांसाठी 18 कोटी 55 लाख

सिताफळाला (Sitaphal) कमीत कमी 2000 रुपये तर जास्तीत जास्त 6000 रुपये व सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. बोराला सरासरी 1750 रुपये भाव मिळाला. भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. वाटाणा (Pea) सरासरी 2500 रुपये. लिंबू (Lemon) 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 1750 रुपये भाव मिळाला. आले 4000 रुपये ते 5000 रुपये तर सरासरी 4500 रुपये. बटाटा (Potato) 1400 ते 1500 रुपये तर सरासरी 1450 रुपये. बीट 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. भेंडी 4000 ते 4500 रुपये, सरासरी 4200 रुपये. फलावर 500 ते 1000 रुपये, सरासरी 700 रुपये. गाजर 1000 ते 1200 रुपये.

उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव
कोकणगाव येथे बौद्ध विहारमध्ये लागली आग

सरासरी 1100 रुपये. दूधी भोपळा 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये. काकडी 1000 ते 2800 रुपये तर सरासरी 1900 रुपये. गवार सरासरी 10000 रुपये. घेवडा 1500 रुपये तर 2000 रुपये तर सरासरी 1700 रुपये. कारली सरासरी 2000 रुपये. कोबी 400 ते 500 रुपये, तर सरासरी 600 रुपये. लसूण 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. ढोबळी मिरची 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये. टोमॅटो 300 ते 700 रुपये तर सरासरी 500 रुपये.

वालवड 1000 ते 1800 रुपये तर सरासरी 1400 रुपये. वांगी 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये. मिरची (हिरवी) 3000 ते 4000 रुपये, सरासरी 3500 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. दोडका (शिराळी) सरासरी 2000 रुपये. पालक प्रतिनग सरासरी 6 रुपये. कोथिंबीर 4 ते 8 रुपये व सरासरी 6 रुपये नग. मेथी भाजी सरासरी 5 रुपये नग असा भाव मिळाला, मुळा सरासरी 10 रुपये प्रतिनग, शेपु सरासरी 5 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com