राहाता बाजार समितीत 10081 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 10081 कांदा गोणी आवक
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10081 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 19432 क्रेट्सची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1500 ते 2000 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 2 ला 950 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 900 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 19432 क्रेट्स ची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 91 ते 125 इतका भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com