कांद्याला राहाता बाजार समितीत मिळाला 'एवढा' रुपये भाव

कांद्याला राहाता बाजार समितीत मिळाला 'एवढा' रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत 5187 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला 281 रुपये भाव मिळाला. काल राहाता बाजार समितीत 5187 गोणी कांद्याची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला प्रतिक्विंटल 3500 ते 4100 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2550 ते 3450 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1300 ते 2500 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2400 ते 2600 व जोड कांदा 400 ते 1300 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 11451 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 151 ते 281 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 96 ते 150 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.