राहाता बाजार समितीत कांद्याला 2200 रुपये भाव
File Photo

राहाता बाजार समितीत कांद्याला 2200 रुपये भाव

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10053 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. तर डाळिंबाच्या (Pomegranate) 23430 क्रेटसची आवक झाली. कांद्याला (Onion) 2200 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1600 ते 2200 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 2- 1050 ते 1550, नंबर 3- 500 ते 1000, गोल्टी कांदा 1400 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 23430 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 116 ते 156 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2-76 ते 115, नंबर 3 - 36 ते 75, नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com