राहाता बाजार समितीत 7968 कांदा गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत 7968 कांदा गोण्यांची आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 7968 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 13092 क्रेटसची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1400 ते 1800 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1350 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1200 ते 1400 व जोड कांदा (Onion) 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 13092 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 165 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 120 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com