राहाता बाजार समितीत 11191 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 11191 कांदा गोणी आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 11191 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (pomegranate) 14642 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1600 ते 2200 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला.

कांदा (onion) नंबर 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1200 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (pomegranate) 14642 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 86 ते 110 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 85 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com