राहाता बाजार समितीत 14207 कांदा गोणी आवक
File Photo

राहाता बाजार समितीत 14207 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee)14207 गोणी कांद्याची (Onion bag) आवक झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 16510 क्रेटसची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1800 ते 2400 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1250 ते 1750 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 16510 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 90 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com