राहाता बाजार समितीत कांद्याला 4500 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 4500 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3808 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 4500 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 6940 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3900 ते 4500 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2750 ते 3850 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1500 ते 2700 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 2800 ते 3300 व जोड कांदा (Onion) 300 ते 1500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 6940 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 111 ते 150 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 110 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com