राहाता बाजार समितीत कांदा 2500 रुपयांवर स्थिर, सोयाबिन 5851 वर

राहाता बाजार समितीत कांदा 2500 रुपयांवर स्थिर, सोयाबिन 5851 वर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याच्या (Onion) 4143 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Onion) जास्ती जास्त 2500 तर लाल कांद्याला (Onion) 2205 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 5851 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 4 हजार 143 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा (Summer onion) नंबर 1 ला 2100 ते 2500 रुपये तर लाल कांद्याला (Red Onion) 1900 ते 2205 असा भाव मिळाला. कांदा (Onion) उन्हाळी नंबर 2 ला 1450 ते 2050 रुपये, लाल कांद्याला 1350 ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1400 रुपये तर लाल कांद्याला 600 ते 1300 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1700 ते 1900 रुपये व लाल कांद्याला 1700 ते 1900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 500 रुपये व लाल कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या ( Pomegranate) 519 क्रेटस ची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 111 ते 135 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 110 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सोयाबिनची (Soybeans) 21 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला (Soybeans) कमीत कमी 5700 ते जास्तीत जास्त 5851 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5775 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला (Corn) 1510 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर सिताफळाच्या 21 क्रेटस ची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 1750 तर जास्तीत जास्त 3500 रुपये व सरासरी 3000 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com