राहाता बाजार समितीत कांदा 3200 तर सोयाबीन 6299 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3200 तर सोयाबीन 6299 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 5879 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3200 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6299 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 5 हजार 879 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2600 ते 3200 रुपये तर लाल कांद्याला 2700 ते 3200 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2550 रुपये, लाल कांद्याला 1750 ते 2650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1600 रुपये तर लाल कांद्याला 700 ते 1700 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 2000 ते 2300 रुपये व लाल कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 500 रुपये व लाल कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 10 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 6299 रुपये असा भाव क्विंटलला मिळाला. गव्हाला 1912 रुपये भाव मिळाला तर हरबरा 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com