राहाता बाजार समितीत कांदा 3300 तर सोयाबीन 6327 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3300 तर सोयाबीन 6327 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 6177 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 3300 तर लाल कांद्याला 3100 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6327 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2700 ते 3300 रुपये तर लाल कांद्याला 2600 ते 3100 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1750 ते 2650 रुपये, लाल कांद्याला 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1700 रुपये तर लाल कांद्याला 700 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 2100 ते 2300 रुपये व लाल कांद्याला 2000 ते 2300 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 500 रुपये व लाल कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 37 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला कमीत कमी 6250 ते जास्तीत जास्त 6327 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6285 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला कमीत कमी 1400, तर जास्तीत जास्त 1449 रुपये तर सरासरी 1425 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. चिकूला 2250 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com