
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Agricultural Produce Market Committee) काल 203 वाहनांमधून लुज कांदा (Onion) लिलावासाठी दाखल झाला होता. कांंद्याला (Onion) सर्वाधिक 1201 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सोयाबीनला (Soybean) सर्वाधिक 6350 रुपये इतका भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत (Rahata Agricultural Produce Market Committee) खुल्या कांद्याला (Open Onion) चांगला प्रतिसाद मिळत आहे. कांदा (Onion) नंबर 1 ला 900 ते 1201 रुपये, कांदा (Onion) नंबर 2 ला 550 ते 850 रुपये, कांदा नंबर 3 ला 100 ते 500 रुपये असा भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 444 क्रेटसची आवक (Inward) झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 125 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 31 ते 60 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये असा भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 5901, जास्तीत जास्त 6350 रुपये, तर सरासरी 6200 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2212 रुपये, जास्तीत जास्त 2233 रुपये, तर सरासरी 2222 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) कमीत कमी 1890 रुपये, जास्तीत जास्त 2129 रुपये, सरासरी 2010 रुपये असा भाव मिळाला. तर तुर (डंकी) सरासरी 4401 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.