राहाता बाजार समितीत कांदा 3300 तर सोयाबीन 6328 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 3300 तर सोयाबीन  6328 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी कांद्याच्या 5686 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3300 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6328 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 6 हजार 328 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2800 ते 3300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1850 ते 2750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 800 ते 1800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2000 ते 2200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 700 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 18 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6100 रुपये, तर जास्तीत जास्त 6328 रुपये व सरासरी 6250 इतका भाव मिळाला. मकाला 1511 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. गहू 2150 रुपये इतका भाव मिळाला. हरभरा डंकी कमीत कमी 3600 रुपये, जास्तीत जास्त 4200 रुपये, तर सरासरी 4000 रुपये भाव मिळाला.

गहू 1930 रुपये, चिकूच्या 163 क्रेट्सची आवक झाली. चिकूला प्रतीक्विंटलला कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 2200 रुपये, सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटलला असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com