राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबिन, डाळींबाला काय मिळाले आज भाव

राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबिन, डाळींबाला काय मिळाले आज भाव
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याच्या (Onion) 3372 गोण्यांची आवक (Inward) झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Onion) जास्ती जास्त 3500 तर लाल कांद्याला (Onion) 3000 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 6800 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3 हजार 372 कांद्याच्या गोण्यांची आवक (Onion Inward) झाली. उन्हाळी कांदा (Onion) नंबर 1 ला 3100 ते 3500 रुपये तर लाल कांद्याला (Onion) 2600 ते 3000 असा भाव मिळाला. कांदा (Onion) उन्हाळी नंबर 2 ला 2350 ते 3050 रुपये, लाल कांद्याला 1750 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 900 ते 2300 रुपये तर लाल कांद्याला 800 ते 1700 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला (Onion) 1600 ते 1800 रुपये व लाल कांद्याला 2100 ते 2400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 200 ते 800 रुपये व लाल कांद्याला 100 ते 700 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 317 क्रेटस ची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 120 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.

सोयाबिनची (Soybean) 23 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला (Soybean) कमीत कमी 6500 ते जास्तीत जास्त 6800 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6650 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला (Corn) 1510 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. सिताफळाच्या 10 क्रेटस चीअ आवक झाली. कमीत कमी 1500 तर जास्तीत जास्त 600 रुपये व सरासरी 2500 भाव मिळाला, तर हरबरा 3875 रुपये प्रतिक्विंटल ने विकला गेला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com