राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीमध्ये (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला सर्वाधिक 1000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 3743 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 450 ते 750 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात दोन तरुण ठार

कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 450 ते 550 रुपये तर जोड कांद्याला 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळींबाच्या 334 क्रेटसची आवक काल झाली. प्रतवारीनुसार प्रतिकिलोला डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 46 ते 75 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव
शरद पवारांची भूमिका योग्यच - ना. विखे

डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 21 ते 45 रुपये, डाळींब नंबर 4 ला 10 ते 20 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला. चिकुला प्रतिक्विंटलला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. गव्हाची 146 क्विंटलची आवक झाली. गव्हाला (Wheat) प्रतिक्विंटला कमीत कमी 1950 रुपये, जास्तीत जास्त 2199 रुपये तर सरासरी 2100 रुपये भाव मिळाला. हरभरा (डंकी) (Gram) किमान 3501 रुपये, जास्तीत जास्त 4690 रुपये तर सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6870 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव
नगर जिल्ह्याला 10 कोटींचा निधी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com