राहाता बाजार समितीत कांदा 1200 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 1200 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबीन आणि भाजीपाल्यासह डाळींबाचीही आवक होत आहे. मंगळवारी कांद्याला 1200 रुपये भाव मिळाला. सोयाबीन ला 4941 रुपये भाव मिळाला तर डाळींबाला प्रतिकिलोला 175 रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 7 हजार 764 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 900 ते 1200 रुपये, कांदा नंबर 2 ला 550 ते 850 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये. गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये, जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. सोयाबीनची 5 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 4941 रुपये भाव मिळाला. हरभरा किमान 4000 रुपये, जास्तीत 4518 रुपये तर सरासरी 4450 रुपये भाव मिळाला.

ज्वारीला सरासरी 3011 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2010 रुपये, जास्तीत जास्त 2066 रुपये, तर सरासरी 2035 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 184 क्रेटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर ला 51 ते 80 रुपये भाव मिळाला. तर डाळींब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com