
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला 1300 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 5010 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 950 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 550 ते 750 रुपये तर जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींबाला प्रतिक्विंटलला सरासरी 7500 रुपये भाव मिळाला. चिकु ला किमान 1000 रुपये तर जास्तीत जास्त 2750 रुपये तर सरासरी 1750 रुपये भाव मिळाला.