
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 6720 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1700 ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 900 ते 1200 रुपये, जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.
सीताफळाला (Sitaphal) कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 6000 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 3500 रुपये भाव मिळाला.
भाजीपाल्याची ही चांगली आवक झाली. वाटाणा सरासरी 2000 रुपये, लिंबू (Lemon) 2000 ते 2500 रुपये तर सरासरी 2200 रुपये. आले 4000 ते 5000 रुपये, सरासरी 4500 रुपये. बटाटा (Potato) कमीत कमी 1400 रुपये, जास्तीत जास्त 1700 रुपये तर सरासरी 1550 रुपये. भेंडी (Okra) कमीत कमी 3000 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये तर सरासरी 4000 रुपये. दुधी भोपळा कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये तर सरासरी 2000 रुपये.
फ्लॉवर कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1000 रुपये तर सरासरी 700 रुपये. ढोबळी मिरची कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 1500 रुपये तर सरासरी 1200 रुपये. दोडका (शिराळी) कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत जास्त 4000 रुपये तर सरासरी 3200 रुपये. गाजर कमीत कमी 2000 रुपये, जास्तीत जास्त 2200 रुपये तर सरासरी 2100 रुपये.
वांगी कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 4000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. मिरची हिरवी कमीत कमी 3500 रुपये, जास्तीत जास्त 4200 रुपये तर सरासरी 3800 रुपये. लसूण कमीत कमी 2000 ते 3200 रुपये तर सरासरी 2600 रुपये. टोमॅटो कमीत कमी 200 रुपये, जास्तीत जास्त 700 रुपये तर सरासरी 450 रुपये. घेवडा 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 1700 रुपये. काकडी कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये तर सरासरी 2000 रुपये.
कारली (Carly) सरासरी 2000 रुपये. कोबी कमीत कमी 300 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपये तर सरासरी 700 रुपये. शेवगा 5000 ते 7000 रुपये तर सरासरी 6000 रुपये. कांदा पात सरासरी 5 रुपये जुडी, कोथिंबीर (Coriander) सरासरी 5 रुपये. मुळा 10 ते 20 रुपये, सरासरी 1500 रुपये. पालक सरासरी 5 रुपये. शेपू 5 ते 7 रुपये, सरासरी 6 रुपये, असा भाव मिळाला.