राहाता बाजार समितीत कांदा 1800 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 1800 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटलला 1800 रुपये इतका भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 7338 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1300 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये, गोल्टी कांदा 600 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 300 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंबाला प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 7000 रुपये, तर सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 265 क्रेट्सची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला 1000 ते 6000 रुपये व सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. पेरुला किमान 1500 ते 3250 रुपये प्रतिक्विंटला भाव मिळाला तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com