राहाता बाजार समितीत कांदा 1700 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 1700 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या 12506 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1300 तर जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 750 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 650 ते 850 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 2867 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com