राहाता बाजार समितीत कांदा 1800 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 1800 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 15932 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 850 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 100 ते 300 रुपये असा भाव मिळाला. डाळिंबाच्या 14 हजार 962 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 ते 155 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती, राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com