राहाता बाजार समितीत 9103 कांदा गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत 9103 कांदा गोण्यांची आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 9103 गोणी कांदा आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 1900 रुपये भाव मिळाला. काल बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या (Onion) 9 हजार 103 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला (Onion) प्रतिक्विंटलला 1500 ते 1900 रुपये असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1450 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 800 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा (Onion) 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 22800 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिकिलोला 96 ते 135 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com