राहाता बाजार समितीत कांद्याच्या 7691 गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत कांद्याच्या 7691 गोण्यांची आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 7691 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 17360 क्रेटसची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटल 1300 ते 1700 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1250 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1100 ते 1300 व जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 17360 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 96 ते 130 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com