राहाता बाजार समितीत 10028 गोणी कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत 10028 गोणी कांद्याची आवक
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10028 गोणी कांदा आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (pomegranate) 17761 क्रेटसची आवक झाली. बाजार समितीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1600 ते 2200 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1000 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 1400 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाच्या (pomegranate) 17661 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला प्रतिकिलोला 91 ते 120 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com