राहात्यात कांदा 4200 रुपये

राहात्यात कांदा 4200 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5474 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला (Onion) सर्वाधिक 4200 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला (Pomegranate) 225 रुपये भाव मिळाला.

काल राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5474 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 3600 ते 4200 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2650 ते 3550 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1300 ते 2600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 2500 ते 2800 व जोड कांदा 500 ते 1300 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 8166 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 146 ते 225 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 96 ते 145, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 95 रुपये व नंबर 4 ला 10 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.