राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'एवढा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'एवढा' भाव
File photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल गुरुवारी कांद्याच्या (Onion) 3592 गोण्यांची आवक (Inward) झाली. प्रतिक्विंटल कांद्याला (Onion) जास्ती जास्त 3200 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 5356 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3 हजार 592 कांद्याच्या (Onion) गोण्यांची आवक (Inward) झाली. कांदा नंबर 1 ला 2900 ते 3300 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2050 ते 2850 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 2000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 2100 ते 2400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 800 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 650 क्रेटसची आवक झाली. डाळींब (pomegranate) नंबर 1 ला 121 ते 150 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (pomegranate) नंबर 2 ला 91 ते 120 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybean) 16 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 5200 ते जास्तीत जास्त 5356 रुपये भाव मिळाला तर सरासरी 5275 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला 1640 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. हरबरा 4552 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सिताफळाच्या 48 क्रेटसची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 500 तर जास्तीत जास्त 3500 रुपये व सरासरी 2500 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com