राहाता बाजार समितीत 13041 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 13041 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 13041 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 17837 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 1250 ते 1650 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 800 ते 1200 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 350 ते 750 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा (Onion) 1100 ते 1300 व जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 17837 क्रेट्सची आवक (Inward) झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 111 ते 150 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 110 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 75 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com