राहात्यात 10208 गोणी कांद्याची आवक

राहात्यात 10208 गोणी कांद्याची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata market committee) 10208 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 21255 क्रेटसची आवक (Inward) झाली. कांद्याला (Onion) 1800 रुपये भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटल 1400 ते 1800 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1350 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 21255 क्रेट्सची आवक (Inward) झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 96 ते 125 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com