राहाता बाजार समितीत कांद्याला 3500 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 3500 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल बुधवार कांद्याच्या (Onion) 2624 गोण्यांची आवक (Inward) झाली. प्रतिक्विंटल कांद्याला (Onion) जास्ती जास्त 3500 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला (Soybean) जास्तीत जास्त 5252 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 2 हजार 624 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 3200 ते 3500 रुपये असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2450 ते 3150 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2200 ते 2500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 900 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 650 क्रेटसची आवक (Inward) झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 150 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 120 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybean) 18 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 5100 ते जास्तीत जास्त 5252 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5175 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला (Corn) 1370 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. गहु (Wheat) 1800 रुपये, डंकी हरबरा 3651 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सिताफळाच्या 76 क्रेटसची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 1500 तर जास्तीत जास्त 4000 रुपये व सरासरी 2500 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com