राहाता बाजार समितीत 16 हजार गोणी कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत 16 हजार गोणी कांद्याची आवक

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी 16 हजार 40 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1400 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

राहाता बाजार समितीत करोनाच्या काळातही शेतीमालाची चांगली आवक होत आहे. सोशल डिस्टंशिंगची काळजी घेतली जात आहे. या बाजार समितीतील सुरु असलेल्या व्यवहारामुळे तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला आहे. कांदा नं. 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला. चिकूची 104 क्रेटस इतकी आवक झाली. चिकुला कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 2000 रुपये असा भाव मिळाला. सरासरी 1500 रुपये भाव मिळाला.

डाळींबाची 2507 क्रेटस इतकी आवक झाली. एक नंबर डाळींबाला प्रतिकिलो 96 ते 125, नं. 2 प्रतिकिलोला 61 ते 95, नं. 3- 31 ते 60, नं. 4- 2.50 ते 30 रुपये इतका भाव प्रतिकिलोला मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com