राहाता बाजार समितीत कांदा 1350 रुपये तर सोयाबीनला 7212 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांदा 1350 रुपये तर सोयाबीनला 7212 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला 1350 रुपये भाव मिळाला. तर सोयाबिनला जास्तीत जास्त 7203 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत काल 4667 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 450 रुपये, गोल्टी कांद्याला 650 ते 850 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळींबाच्या 84 क्रेटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 71 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 51 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 31 ते 50 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 7212 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. हरबरा कमीत कमी 3680 रुपये, जास्तीत जास्त 4441 रुपये तर सरासरी 4350 रुपये इतका भाव मिळाला.

गहु कमीत कमी 2137 रुपये, जास्तीत जास्त 2217 रुपये, तर सरासरी 2175 रुपये इतका भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1899 रुपये भाव मिळाला, मकाला कमीत कमी 2340 रुपये, जास्तीत जास्त 2359 रुपये तर सरासरी 2350 रुपये इतका भाव मिळला असल्याची माहिती, राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.