राहाता बाजार समितीत कांदा 1150 रुपये तर सोयाबीन 6750

राहाता बाजार समितीत कांदा 1150 रुपये तर सोयाबीन 6750

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याला 1150 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6750 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बाजार समितीत काल 6598 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 450 रुपये, गोल्टी कांद्याला 450 ते 650 रुपये भाव मिळाला तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंबाच्या 206 क्रेटसची आवक झाली.

डाळिंब नंबर 1 ला 111 ते 140 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 6600 रुपये, जास्तीत जास्त 6750 रुपये तर सरासरी 6675 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला सरासरी 2211 रुपये इतका भाव मिळाला. हरबरा कमीत कमी 4200 रुपये, जास्तीत जास्त 4400 तर सरासरी 4350 रुपये, तुरीला सरासरी 5101 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला तर मकाला सरासरी 2276 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.