राहाता बाजार समितीमधील कांदा व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता बाजार समितीमधील कांदा व सोयाबीनचे वाचा भाव
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल गुरुवारी कांद्याला (Onion) 1250 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 7276 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत (Rahata Market Committee) काल 2203 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 950 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 इतका भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 450 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 800 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा (Onion) 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 432 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 111 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7276 रुपये तर सरासरी 7250 इतका भाव मिळाला. हरबरा सरासरी 4447 रुपये असा भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2137 रुपये, जास्तीत जास्त 2161 रुपये, तर सरासरी 2150 रुपये इतका भाव मिळाला, चिंचेला सरासरी 1140 रुपये इतका भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.